अधिकृत फेसबुक पेज

चालु घडामोडी

साकाई देवी भक्तिगीते

कार्यक्रम / उत्सव

श्री साकाई देवी यात्रौत्सव :

श्री साकाई देवी, आमच्या उमेळे गावाची ग्रामदेवता आपणा सर्वांची श्रद्धास्थान. गावात देवीच्या प्रतिष्ठापनेनंतर दरवर्षी चैत्र कृष्ण चतुर्दर्शीला देवीचा यात्रोत्सव साजरा होतो. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व देवींची “चैत्रवळ ” ह्या शब्दाने सर्वश्रुत असलेला हा उत्सव उमेळे गावात पारंपरिक पद्धतीने आजही होत आहे, आर्थिक परिस्थिती बेताची व पाण्याचे दुर्मिक्ष्य असतानाही नातेवाईक व पाहुण्यांचा राबता गावातील प्रत्येक घरात असायचा. अधिक वाचा

नवरात्रौउत्सव :

गणरायाला वाजत गाजत निरोप दिल्यानंतर गावात नवरात्रौउत्सवाचे पडद्यम वाजू लागतात.विविध स्पर्धांच्या आयोजना सबंधी बैठक घेवून स्पर्धा प्रकार ठरवले जातात ५१ गटात ह्या स्पर्धा होतात. देवळाभोवती मंडप घालून शोभनिय रोषणाई केली जाते.रोज देवीला अभिषेक केला जातो.अष्टमीच्या होमाच्या दिवशी भंडारचे आयोजन केले जाते.गरबानृत्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात. अधिक वाचा

गावहाळी :

देवीचे आगमन उमेळे गावच्या वेशीवर आल्यानंतर देवीच्या रक्षकांना नैवेद्य देण्याचा प्रघात पूर्वापार सुरू होता व आहे.रात्रौ देवीचा हरीक भरल्यानंतर नैवेद्य हातात घेऊन गावातील तरूण मंडळी ‘वागरू – वागरू’ म्हणत गावच्या सभोवताली वेशीवर रक्षकांना नैवेद्य दाखवला जातो. अधिक वाचा

श्रावणातील शनिवारची वाडी :

पवनपुत्र हनुमानाचे सुंदर मंदिर उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळातर्फे गावात बांधण्यात आले. श्रावणी शनिवारी गावातील भक्तजणांकडून हनुमान मूर्तीला वाडी अर्पण करण्यात येते. केवडा व फुलांची ताटी [आरास] बनवून आपापल्या घरातून वाजत गाजत सर्वजण एकत्र हनुमान मंदिरा भोवती ५ प्रदक्षिणा घालतात. अधिक वाचा

अभिप्राय

समीर गीध
समीर गीध
Read More
श्री साकाई देवी आमची कुलुस्वामीनी आहे. मंदिर खूप छान आणि नीटनेटके आहे. परिसर खूपच सुंदर आहे. भटजी हि खूप सहकार्य करतात.
अतुल काटदरे
अतुल काटदरे
Read More
खुप सुंदर व देखणं मंदीर असून मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. मंदीरात शांती व पवित्र्य दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळतात. देवीची कृपा गावकऱ्यांवर कायम राहो हीच सदिच्छा!
हितेश सावे
हितेश सावे
Read More
देवीचे दर्शन आणि मंदिर पाहिल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले. नवरात्रीनिमित्त मंदिरात येण्याची संधी मिळाली. असे देवालय हे तालुक्याचे भूषण म्हणावे लागेल
संजय गीध
संजय गीध
Read More
श्री साकाई देवी देवस्थान जागृत देवस्थान आहे. मंदिर परिसरामध्ये शांतता आहे. मन प्रसन्न होते.
संतोष वर्तक
संतोष वर्तक
Read More
जागृत देवस्थान. उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळ खूप छान उपक्रम राबवत असते. साकाई देवीची जत्रा चैत्र महिन्यामध्ये मध्ये खुप मोठी भरते. देशभरातील भक्तगण यावेळी देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात.
Previous
Next