|| श्री साकाई देवीची आरती ||

जय देवी जय देवी साकाई आई
भक्तांच्या हाकेला धावूनिया येई, जय देवी जय देवी ।।धृ।।
सोपारा खाडीत प्रकट तू होई
इतरांच्या भक्तीला यश न येई
उमेळा गावाला दृष्टांत देई
माझ्या आगमनाची करा तयारी, जय देवी जय देवी ।।1।।
उमेळा गाव खेडे लहान
गावकऱ्यांची भक्ती महान
वाजत, गाजत झाले आगमन
भक्तांनी केले प्रतिष्ठापन, जय देवी जय देवी ।। 2।।
भ्राता तुझा तो गणोबाराया
गावासाठी असे खडा पहारा
शुभ्र वेष तो शुभ्र तो घोडा
गाव झाला तुमच्या भक्तीत वेडा, जय देवी जय देवी ।।3।।
शुभकार्यासाठी गाव जागला
हरिकाचा मान तुझा पहिला
चैत्र चतुर्दशीला मेळा जमला
सान थोर येती तुझ्या जत्रेला, जय देवी जय देवी ।।4।।
वज्रेश्वरी, जागमाता आणि चुळणाई
आनंदी, जिवदानी, शितलाही देवी
साही हया भगिनी सातवी साकाई
बंधू गणोबा अमूर्त राही, जय देवी जय देवी ।।5।।
दरबारी तुझ्या भक्तगण जमला
श्रध्देने तुझ्या भक्तीत रमला
आम्ही विनवितो तुझीया चरणाला
सात्वर धाव घे आमुच्या हाकेला जय देवी जय देवी ।।6।। 

रचनाकार: श्री. हेमंत जगन्नाथ राऊत