लेख व माहिती
उमेळे परिसरातील देवस्थाने
उमेळे परिसरातील ज्ञात आात मंदिरामध्ये मुख्यतः श्री हनुमान मंदिर, श्री साकाई देवी मंदिर( मुळस्थान / देवीस्थान / सद्यस्थान), श्री दत्त मंदिर, श्री बामण देव मंदिर, श्री साई गणेश मंदिर, श्री निर्मला माता मंदिर यांचा समावेश आहे. श्री हनुमान मंदिरातील हनुमानाची छोटेखानी प्राचीन मूर्ती (तलावात सापडलेली)आहे. उमेळे ग्रामस्थांची ग्रामदेवता श्री साकाई देवीची मूर्ती आणि देवीच्या मंदिराची निर्मिती कथा व उगमस्थान यांचा समावेश आहे. उमेळे परिसरातील सर्व देवस्थानांविषयी माहिती देण्यात आली आहे.
एक अनुभव – श्री गणोबा देव
अमृत स्वरूपात असलेला श्री साकाई देवी व तिच्या सहा बहिणींचा भाऊ श्री गणोबा देव हा शुभ्र वेषात घुंगराची काठी घेऊन गावाचे रक्षण करतो, हि गावातील पिढयान पिढयाची श्रध्दा आहे. गावातील जेष्ठ नागरिक कै. श्री. हरिश्चंद्र केशव चौधरी तसेच कस्टम विभागातील सर्वात जेष्ठ महिला श्रीमती रुक्मिणी मोरे उर्फ मोरे मामी ह्यांनी तसेच गावातील अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे.
उमेळाची शेती व वाडी
उमेळे गावातील शिलेदारांची ऐतिहासिक कामगिरी
उमेळयाच्या चौधरींनी वसई महायुध्दाच्या रणसंग्रामात बरीच मोलाची भूमिका बजावलेली आहे. उमेळातील सोमवंशी क्षत्रिय जातीतील लोकांनी वसई संग्रामात सक्रीय सहभाग घेतला होता हे निर्विवादपणे स्पष्ट होते. पेशवे दप्तरांतील दस्तावेजांत काही ठिकाणी उमेळातील लोकांच्या कामगिरीची वर्णने अभ्यासण्यात मिळतात.
इ.स. 1737-1739 च्या कालखंडात गंगाजी नाईक अणजूरकर यांचे लोक पेशव्यांचे सरदारांस खात्री पटविण्याकरीता आणीत त्यावेंळी उमेळयास कुकर चौधरीकडे ते राहत असत. लखम चौधरी हे कुकर उर्फ कुक चौधरी यांचे भाऊ होत. अणजुरास (भिवंडी) गंगाजी नाईकांनी भवानीचा गोंधळ घालून सर्व मदतनीसांस कामे वाटून दिली त्यांत लखम चौधरी होते. तुंगारचे रानात राहून बातमी देण्याची कामगिरी चौधरी गृहस्थांकडे सोपविण्यात आली. उमेळयाचे बंदरी हयाच कुक (कुकर) चौधरींने फौजेस उतरावयास गलबत आणले होते. तुंगारचे रानांत व गलबत आणण्याचे वेळी चौधरीस महादेव आंबेमोडा हे मदत करीत होते. राजावलीचे ताऱ्यावरून पायउताऱ्याना उतरनांना वाट दाखविण्यास आंबेमोडाच होते. हया मंडळींनी वाटाडयाचे व लागाचे काम प्रामाणिकपणे व उत्तमपणे केले. पुढे लढायांतही यांचा सहभाग झाल्याचे संदर्भ मिळतात.